June 19, 2024 7:26 PM June 19, 2024 7:26 PM
8
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं आकाशवाणी मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यात योग विद्या निकेतनचे कार्याध्यक्ष महेश सिनकर आणि प्रशिक्षक सुनील भुजबळ यांनी मार्गदर्शन करत योगासनांची प्रात्यक्षिकंही दाखवली. [video width="848" height="480" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/uploads/2024/06/yoga.mp4"][/video] सुनील भुजबळ यांची मुलाखत शुक्रवारी २१ जूनला सकाळी ११ वाजता एफ एम गोल्ड वरून तर महेश सिनकर यांची मुलाखत एफ एम रेनबोवर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी प्रसारित होईल.