April 7, 2025 1:22 PM April 7, 2025 1:22 PM

views 2

केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे योग महोत्सवाचं आयोजन

केंद्रीय आयुष मंत्रालयाने मोराजी देसाई राष्ट्रीय योग संस्थानाच्या सहकार्याने आज सकाळी कलिंगा मैदानात योग महोत्सवाचं आयोजन केलं होतं. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला ७५ दिवस बाकी असताना सुरू केलेल्या उलटी गिनती या कार्यक्रमाविषयी प्रतापराव जाधव यांनी अधिक माहिती दिली. 

March 13, 2025 1:37 PM March 13, 2025 1:37 PM

views 2

केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते योग महोत्सव २०२५चं उद्घाटन

केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत योग महोत्सव २०२५ चं उद्घाटन केलं. आंतरराष्ट्रीय योग दिन शंभर दिवसांवर आला असून या दिवसात देशाच्या विविध भागात योगाशी संबंधित महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यात योग बंधन हा १० देशात होणारा कार्यक्रम तर योग संगम हा देशातल्या १० हजारांहून अधिक ठिकाणी होणारा कार्यक्रम यांचाही समावेश आहे, असं  त्यांनी सांगितलं.