June 21, 2024 3:06 PM June 21, 2024 3:06 PM

views 16

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं हे भारतीयांचं कर्तव्य – राज्यपाल रमेश बैस

योगाच्या अमूर्त ठेव्याचं रक्षण करणं आणि त्याचा प्रचार-प्रसार करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केलं. राजभवनमधे त्यांच्या उपस्थितीत योगसत्राचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते.   भारतीय जीवनशैलीची आयुर्वेद आणि योगा ही विशेष अंग - मुख्यमंत्री शिंदे     भारतीय जीवन शैलीची आयुर्वेद आणि योगा ही दोन विशेष अंगं आहेत, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. गेट वे ऑफ इंडिया इथं आयोजित योग दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते...

June 21, 2024 1:35 PM June 21, 2024 1:35 PM

views 12

नवी दिल्लीत संसदभवन इथं योगसत्राचे आयोजन

नवी दिल्लीत संसदभवन इथं आज विशेष योग सत्र आयोजित करण्यात आलं होतं. त्याचं नेतृत्व लोकसभेचे माजी सभापती ओम बिर्ला यांनी  केलं. योगाभ्यास हा मानवी आयुष्याचा पाया बनला असून त्यानं सगळ्या सांस्कृतिक सीमा ओलांडल्या आहेत, असं ते यावेळी म्हणाले.  केंद्रीय परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर, आरोग्य मंत्री जे पी नड्डा, माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू, युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविय अशा अनेक मान्यवरांनी दिल्लीत योग दिन साजरा केला. 

June 21, 2024 2:35 PM June 21, 2024 2:35 PM

views 12

दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सर्वत्र उत्साह

दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन आज संपूर्ण देशभरात तसंच जगभरातल्या अनेक देशांमध्ये उत्साहानं साजरा होत आहे. "स्वतःसाठी आणि समाजासाठी योग" ही या वर्षीच्या योग दिवसाची मध्यवर्ती संकल्पना आहे.आंतरराष्ट्रीय योग दिनाचा देशातला मुख्य कार्यक्रम जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत थोड्याच वेळात सुरू होत आहे. योग हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवण्यासाठी वचनबद्ध रहा, आपल्याबरोबरच इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग दिनानिमित्त...

June 20, 2024 7:07 PM June 20, 2024 7:07 PM

views 9

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त देशोदेशी कार्यक्रम होत आहेत. बांगलादेशात भारतीय राजदूतावासानं ढाका येथील मिरपूर इनडोअर स्टेडिअममध्ये उद्या योग दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असून या कार्यक्रमात बांगलादेशची योग संघटना सहभागी होणार आहे. बांगलादेशातले भारतीय राजदूत प्रणय वर्मा सर्वांचं स्वागत करणार आहेत.   नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं काल पोखरा इथं फेवा तलावाच्या काठी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन केलं होतं. त्यात स्थानिक रहिवासी, स्थानिक प्रशासन यंत्रणांचे अधिकारी, भारतीय लष्करातील निवृत्त गोरखा...