June 20, 2025 1:46 PM June 20, 2025 1:46 PM

views 18

११व्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित योगसंगमात नोंदणी करणाऱ्यांची संख्या १० लाखांच्या वर

अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या २१ जूनला साजरा होणार आहे. आयुष मंत्रालयानं विशाखापट्टणम इथं आयोजित केलेल्या मुख्य समारंभामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी योग प्रात्यक्षिकांमधे भाग घेणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं देशभरातील १०० पर्यटन स्थळांवर योग दिन साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी योग ही एक जीवनशैली आहे असं सांगत योगाभ्यासाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचं आव...

June 12, 2025 1:24 PM June 12, 2025 1:24 PM

views 10

देशभरात एक लाखाहून अधिक ठिकाणी योग कार्यक्रम होणार

  यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात येत्या २१ तारखेला सकाळी साडे सहा ते ७ वाजून ४० मिनिटं या वेळेत एक लाखाहून अधिक योग कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जातील अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. ते आज नवी दिल्लीत यंदाच्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते. यंदाची योग दिनाची संकल्पना एक पृथ्वी - एक स्वास्थ के लिए योग अशी आहे. यंदाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखा पट्टणम इथे होणार असून या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सह...

June 17, 2024 2:51 PM June 17, 2024 2:51 PM

views 42

आंतरराष्ट्रीय योग दिनापूर्वी प्रधानमंत्री मोदींनी भद्रासनाचा व्हिडिओ केला शेअर

येत्या २१ जूनला असलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं औचित्य साधत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज समाजमाध्यमावर भद्रासन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. भद्रासनामुळे सांधे दुखी कमी होऊन ते मजबूत होतात. रोज भद्रासन केल्यामुळे गुडघेदुखीचा त्रासही कमी होतो, असं  प्रधानमंत्र्यांनी हा व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे.