August 29, 2025 11:18 AM August 29, 2025 11:18 AM

views 2

इस्रायलचे राजधानी साना इथं हवाई हल्ले

इस्रायलनं येमेनची राजधानी साना इथं काल हवाई हल्ले केले. साना शहराच्या दाट लोकवस्तीच्या भागात हे हल्ले झाले. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी या हल्ल्यांना दुजोरा दिला असून हे हवाई हल्ले हुथी नेत्यांना लक्ष्य करून करण्यात आल्याचं इस्रायलच्या सरकारी माध्यमांनी सांगितलं आहे.   इस्रायली सैन्याने येमेनमधून सोडलेले दोन ड्रोन रोखल्याचे वृत्त दिल्यानंतर काही तासांतच हे हल्ले करण्यात आले. दरम्यान या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही.