July 7, 2025 2:33 PM July 7, 2025 2:33 PM

views 4

येमेनच्या होदेइदाह प्रांतात लाल समुद्रातल्या अनेक बंदरांवर इस्राएलचे हवाई हल्ले

इस्राएलनं मध्यरात्रीच्या सुमारास येमेनच्या होदेइदाह प्रांतात लाल समुद्रातल्या अनेक बंदरांवर हवाई हल्ले केले. हा भाग तत्काळ रिकामा करण्याबाबत समाज माध्यमावर इशारा दिल्यानंतर काही वेळातच इस्राएलच्या सैन्याकडून हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात हूतींचे गड मानले गेलेल्या होदेइदाह, अस सालिफ अशा भागांना लक्ष्य करण्यात आल्याचं इस्राएलच्या संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं. २०२३ मध्ये हे प्रदेश हूतींनी ताब्यात घेतले होते. इराणमधून शस्त्रांची आयात करण्यासाठी या बंदरांचा वापर केला जात होता. 

January 1, 2025 2:27 PM January 1, 2025 2:27 PM

views 11

येमेनमध्ये हौथी संघटनेच्या ताब्यातल्या लष्करी तळांवर अमेरिकेचे हवाई हल्ले

येमेनची राजधानी साना इथं हौथी या लढाऊ गटाच्या लष्करी तळांवर अमेरिकन लष्कराने हवाई हल्ले केले आहेत. हौथीकडून चालवल्या जाणाऱ्या दूरचित्रवाहिनीने ही माहिती दिली. हौथीच्या संरक्षणदलाची इमारत तसंच दारुगोळा उत्पादनांचा कारखाना अशा ठिकाणांवर झालेल्या हल्ल्यांमुळे लक्षणीय नुकसान झाल्याचं या वृत्तवाहिनीनं म्हटलं आहे. तीस आणि एकतीस डिसेंबरला केलेले हे हल्ले तांबडा समुद्र आणि एडनच्या आखातातल्या अमेरिकी जहाजांना नुकसान पोचवण्याची हौथी बंडखोरांची क्षमता नष्ट करण्यासाठी असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. हौथीने प...