December 31, 2025 9:11 AM December 31, 2025 9:11 AM
10
नव वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे, पुणेसह विविध शहरांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त
2025 या वर्षातील आजचा शेवटचा दिवस.... सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्यात सर्वत्र, विशेषतः तरुणाईमध्ये उत्साह पहायला मिळत आहे. राज्यातली पर्यटन स्थळ पर्यटकांनी फुलून गेली आहेत. शहरांमधील विविध उपाहारगृह आणि हॉटेलही सज्ज झाले आहेत. नव वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मुंबई ठाणे, पुणे आणि पिंपरी चिंचवडसह विविध शहरांमध्ये कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येणार आहे. दरम्यान नवीन वर्षाचं स्वागत देव दर्शनानं करण्याकडेही अ...