April 23, 2025 6:49 PM April 23, 2025 6:49 PM

views 13

यवतमाळ जिल्ह्यात नर्सरी ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरणा

गेल्या काही दिवसात वाढलेल्या उन्हाच्या पाऱ्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात पुढचे आठ दिवस नर्सरी ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत. जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. हे आदेश सर्व शासकीय आणि निमशासकीय शाळांना लागू राहणार आहेत.

January 25, 2025 7:17 PM January 25, 2025 7:17 PM

views 6

यवतमाळ जिल्ह्यातील बस अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथं शाळेची बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. यात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात का हे तपासा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

September 9, 2024 3:54 PM September 9, 2024 3:54 PM

views 10

यवतमाळमधे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ३६ महिला बचत गटांना ई-रिक्षाचे वितरण

प्रधानमंत्री खनिकर्म योजनेंतर्गत यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ महिला बचत गटांना तेजस्विनी कृषि माल वाहतूक ई-रिक्षाचं वाटप पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नेरच्या महिला बचत गटाला बँक कर्जाचे चेक वितरण आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या तालुक्याच्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन राठोड यांच्याहस्ते गौरविण्यात आलं. जिल्ह्यात माविमच्या महिला बचत गटाला ५०० ई-रिक्षा वितरीत करण्यात येतील तसंच वटफळी गावाजवळ महिला बचत गटाकरता गारमेंट क्लस्टर उभारण्यात येईल असं राठोड यांनी सांगितलं.

August 9, 2024 10:33 AM August 9, 2024 10:33 AM

views 11

यवतमाळच्या डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर

यवतमाळच्या मुकूटबन इथल्या डॉ विवेक पोलशेट्टीवार यांना रसायनशास्त्रातील योगदानासाठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 23 ऑगस्टला दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डॉ पोलशेट्टीवार सध्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेमध्ये प्रोफेसर आहेत.   हवेतील कार्बनचे घटक वेगळे करून त्याचे उपयोगी घटकात रुपांतर करण्याबाबत त्यांनी संशोधन केलं आहे. प्रदुषण मुक्तीच्या दिशेने टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जातं. हवामान बदल, जागतिक तापमान वाढ या विषयावर पोलशेट्टीवार सं...