October 18, 2025 3:23 PM

views 57

यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांची पर्यावरण पूरक दीपोत्सव साजरा करण्याची शपथ

यवतमाळ जिल्ह्याच्या कळंब तालुक्यातील परसोडी खुर्द इथल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण पूरक दीपोत्सव साजरा करण्याची शपथ घेतली. मोठ्या आवाजाच्या फटाक्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडतं तसंच मानवासह पशुपक्ष्यांवर त्याचे विपरीत परिणाम होतात, याबाबत शिक्षकांनी माहिती देऊन विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली.

July 20, 2025 6:54 PM

views 26

यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या परिचारिकांचं कामबंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनात, आज यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या परिचारिकांनीही सहभाग नोंदवत काम बंद आंदोलन सुरू केलं.  या आंदोलनाला शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. वेतन, लिंगभेद, स्वतंत्र संचालनालय या आणि अशा विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेनं अलिकडेच मुंबईत आझाद मैदानावर धरणं आंदोलन केलं होतं. मात्र सरकारनं त्याची दखल न घेतल्यानं संघटनेनं १८ जुलैपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केलं आहे..

January 30, 2025 7:13 PM

views 20

यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

यवतमाळ जिल्हा नियोजन समितीची बैठकही आज पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सन 2025-26 या आर्थिक वर्षातल्या 659 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी देण्यात आली. जिल्हा नियोजन मधून मंजूर झालेला कुठल्याही विभागाचा निधी शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घ्या, या निधीतून होणारी कामे दर्जेदार आणि वेळेत करा, असे निर्देश राठोड यांनी यावेळी दिले.

August 8, 2024 7:20 PM

views 14

रसायनशास्त्रातल्या शांती स्वरूप भटनागर पुरस्कारासाठी यवतमाळचे डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांची निवड

यवतमाळ जिल्ह्यातले मुकुटबनचे रहिवासी डॉ.विवेक पोलशेट्टीवार यांची राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांना रसायनशास्त्रातील शांती स्वरूप भटनागर हा पुरस्कार २३ ऑगस्ट रोजी दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणार आहे. सध्या ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये कार्यरत आहेत.त्यांनी हवेतील कार्बनचे घटक वेगळे करून त्याचे उपयोगी घटकात रूपांतर करण्याबाबत संशोधन केलं आहे.   केंद्र सरकारनं काल राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार जाहीर केले. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेष या क्ष...

August 8, 2024 7:16 PM

views 32

यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियान अंतर्गत सन २०२३ साठी यवतमाळ जिल्ह्यातल्या ७६ क्षयरोगमुक्त ग्रामपंचायंतींची निवड झाली आहे. हा कार्यक्रम वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित कऱण्यात आला होता. यावेळी संरपंच आणि सचिवांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते करण्यात आला.

June 25, 2024 3:58 PM

views 22

यवतमाळमध्ये दिव्यांग्यांच्या पंढरपूर वारीचं आयोजन

राज्यातली पहिलीच पूर्णत: दिव्यांगांची पंढरपूर वारी यवतमाळच्या दिव्यांग संघ आणि सेवा समर्पण प्रतिष्ठानच्यावतीनं आयोजित करण्यात आली आहे. मोठ्या संख्येने दृष्टिहीन वारकरी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी आज निघाले. संत सूरदास यांची प्रतिमा आणि पादूका घेऊन आर्णी, दिग्रस, पुसद, कळमनुरी, परभणी, परळी, अंबेजोगाई, कुर्डूवाडी, पंढरपूर असा २२ दिवस ५२१ किमीचा हा प्रवास पायी करून दिव्यांग वारी पंढरपूरला पोहचेल.