August 3, 2025 8:06 PM

views 4

खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा वेळे आधीच स्थगित

वार्षिक अमरनाथ यात्रा प्रतिकूल हवामान आणि खराब रस्ते या कारणांमुळे आजपासून स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा ९ ऑगस्ट रोजी समाप्त होणार होती. तीन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली होती.   मात्र बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्ग यात्रेसाठी सुरक्षित नसून या मार्गांवरून यात्रा पुन्हा सुरू होणार नसल्याची घोषणा काल अधिकाऱ्यांनी केली. यावर्षी सुमारे चार लाख यात्रेकरूंनी अमरनाथ गुहेचं दर्शन घेतलं आहे.

June 29, 2025 7:17 PM

views 18

ओदिशा सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा

ओदिशामध्ये पुरी इथे आज सकाळी भगवान जगन्नाथाच्या यात्रेवेळी चेंगराचेंगरी होऊन तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि १२हून अधिक जण जखमी झाले. जगन्नाथ मंदिर परिसरातल्या गुंडिचा मंदिर इथे आज पहाटे भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी जमलेली असताना ही दुर्घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. प्रशासनाने या दुर्घटनेची चौकशी सुरू केल्याची माहिती पुरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहनचरण यांनी या दुर्घटनेबद्दल...

June 29, 2024 8:13 PM

views 19

अमरनाथ यात्रेला आजपासून सुरुवात

अमरनाथ यात्रेला आज सुरुवात झाली. अमरनाथ यात्रेसाठी जम्मूतल्या भगवती नगर बेस कॅम्प इथून आज पहाटे चार हजार २९ यात्रेकरूंची दुसरी तुकडी रवाना झाली. कडेकोट सुरक्षेसह यात्रेकरूंच्या २०० वाहनांचा ताफा काश्मीर खोऱ्याकडे रवाना झाला. तत्पूर्वी बेस कॅम्पचा परिसर बम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. जम्मू बेस कॅम्प इथून आतापर्यंत आठ हजार ६३२ यात्रेकरू अमरनाथ यात्रेसाठी रवाना झाले आहेत. हेलिकॉप्टर सेवेद्वारे पोहोचलेल्या तीन हजारहून अधिक यात्रेकरूंनी आज  पवित्र गुफेत शिवलिंगाचे दर्शन घेत...