July 18, 2025 8:08 PM July 18, 2025 8:08 PM
12
वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
घरात रोकड आढळल्याने वादग्रस्त ठरलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वर्मा यांच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या त्रिसदस्यीय अंतर्गत समितीच्या निष्कर्षाला आव्हान देणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे. या समितीने पूर्वग्रहावर आधारित चौकशी केली असून आपल्याला बाजू मांडण्याची पुरेशी संधी दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव मांडण्याची शक्यता असताना ही याचिका दाखल झाली आहे.