April 17, 2025 7:57 PM April 17, 2025 7:57 PM

views 4

यमुना नदीबाबत आखलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक

यमुना नदीत सोडलं जाणाऱ्या सांडपाण्याचं प्रमाण आणि ते सोडण्याच्या आधी त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जात आहे कि नाही याची प्रत्यक्ष तपासणी आवश्यक आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. यमुना नदीची सद्यपरिस्थिती आणि तिच्या पुनरुज्जीवनासाठी आखलेल्या योजनांचा आढावा घेण्यासाठीची बैठक आज नवी दिल्लीत मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते.

March 13, 2025 1:45 PM March 13, 2025 1:45 PM

views 7

यमुना नदीच्या पाण्यामध्ये सजीव सृष्टी जिवंत राहण्याची क्षमता शून्य

दिल्लीजवळ वाहणाऱ्या यमुना नदीच्या पाण्यामध्ये सजीव सृष्टी जिवंत राहण्याची क्षमता जवळजवळ शून्य असल्याचं संसदीय समितीने म्हटलं आहे. यमुनेत निरीक्षणांतर्गत असलेल्या ३३ पैकी २३ ठिकाणांमधल्या पाण्याची गुणवत्ता अतिशय कमी असल्याचं या समितीनं म्हटलं आहे. नदीकिनाऱ्यावर अनेक सांडपाणी स्वच्छता प्रकल्प कार्यरत असूनही नदीचं पाणी प्रदूषित असल्याचं यमुना नदी स्वच्छता प्रकल्पावरच्या आपल्या अहवालात समितीने म्हटलं आहे.