September 16, 2024 10:04 AM September 16, 2024 10:04 AM
11
यागी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या देशांच्या मदतीसाठी भारताचं ऑपरेशन सद्भाव सुरू
यागी चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या देशांना मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत देण्यासाठी भारताने ऑपरेशन सद्भाव सुरू केले आहे. या अंतर्गत भारताने व्हिएतनामला 10 लाख डॉलरची मदत पाठवल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. काल एका विशेष विमानाने 35 टन साहित्याची मदत व्हिएतनामला रवाना करण्यात आली. त्यात जलशुद्धीकरणाच्या वस्तू, पाण्याचे डबे, गरम चादरी, स्वयंपाकघरातील भांडी आणि सौर कंदील यांचा समावेश आहे. नवी दिल्लीमधून विशेष विमानात दहा टन मदत पुरवठा लाओसला पाठवला आहे.