March 1, 2025 12:23 PM March 1, 2025 12:23 PM

views 10

राज्यभरातले इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन

येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यभरातले इयत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाइन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध झाला.   आतापर्यंत केवळ मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक महापालिका क्षेत्रातले अकरावी चे प्रवेश ऑनलाइन होत होते. इथून पुढे इयत्ता अकरावी चे सर्व प्रवेश ऑनलाइन होणार आहेत, प्रवेशाच्या पहिल्या चार फेऱ्या झाल्यानंतर वर्ग सुरू होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.