June 14, 2025 1:36 PM
7
दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर
जागतिक क्रिकेट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाकडे वाटचाल करत आहे. सामन्याचा दोन दिवसांचा खेळ अजून शिल्लक असून, दक्षिण आफ्रिका आपल्या दुसऱ्या डावात विजयापासून केवळ ६९ धावा दूर आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांवर रोखला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियानं ७४ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात विजयासाठी २८२ धावांचं लक्ष्य मिळालं. त्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा सलामीवीर रिकल्टन अव...