July 2, 2024 1:03 PM July 2, 2024 1:03 PM
18
२३ वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ८ पदकं जिंकत भारत अग्रस्थानी
जॉर्डन इथं सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत २३ वर्षांखालच्या वयोगटात भारतीय कुस्तीपटूंनी ८ पदकं जिंकून अव्वल स्थान पटकावलं आहे. यात चार सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या ७० किलो वजनी गटात अभिमन्यू याने, ९२ किलो गटात जॉन्टी कुमारी, ९७ किलो गटात साहिल जगलान आणि १२५ किलो वजनी गटात अनिरुद्ध कुमार यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. रोहित आणि जयदीप यांनी रौप्य तर शुभम आणि अमित यांनी कांस्य पदक पटकावलं.