August 14, 2024 1:23 PM August 14, 2024 1:23 PM

views 14

कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाच्या निर्णयाला पुन्हा स्थगिती

महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रता प्रकरणाचा निकाल क्रीडा न्याय प्राधिकरणानं पुन्हा पुढे ढकलला आहे. आता हा निकाल १६ ऑगस्ट रोजी जाहीर होण्याची शक्यता असल्याचं भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं म्हटलं आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ५० किलो वजनी गटात क्युबाची कुस्तीपटू युसनेलिस गुझमान लोपेझ हिच्यासोबत संयुक्त रौप्यपदक आपल्याला देण्यात यावं, अशी मागणी विनेशनं क्रीडा प्राधिकरणाकडे केली होती. सुवर्णपदकाच्या सामन्याच्या दिवशी तिचं वजन १०० ग्रॅम अधिक भरल्यानं तिला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं होतं.

July 7, 2024 6:27 PM July 7, 2024 6:27 PM

views 14

कुस्तीपटू विनेश फोगटला स्पेन ग्रांप्रीमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक

स्पेनच्या माद्रिद इथं ग्रां प्री ऑफ स्पेन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात भारताची अव्वल कुस्तीपटू विनेश फोगटनं सुवर्णपदक जिंकलं. अंतिम फेरीत फोगटनं रशियाच्या मारिया ट्युमेरेकोव्हावर १०-५ अशी मात केली.    विनेश आता पॅरिस ऑलिंपिकच्या तयारीसाठी २० दिवसीय प्रशिक्षणासाठी फ्रान्सला रवाना होत आहे.