February 22, 2025 1:44 PM February 22, 2025 1:44 PM

views 5

WPL :- स्पर्धेत आज यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना

महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेत आज यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. बंगळूरू इथं संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सनं आत्तापर्यंत झालेल्या तीनपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे तर, यूपी वॉरियर्सनं अद्याप एकही सामना जिंकलेला नाही त्यामुळे ते पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असतील.   दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर ४ गडी राखून विजय मिळवला. पहिली फलंदाजी करताना बंगळु...

February 21, 2025 3:34 PM February 21, 2025 3:34 PM

views 7

WPL :- क्रिकेट स्पर्धेत आज बंगळूरूचा सामना मुंबई इंडियन्ससोबत

महिला प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा सामना मुंबई इंडियन्ससोबत होणार आहे. चेन्नई इथं संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल.   या स्पर्धेत बंगळुरूनं या आधी झालेले आपले दोन्ही सामने जिंकले आहेत, तर मुंबईनं दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकला, तर एका सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला.

February 16, 2025 3:36 PM February 16, 2025 3:36 PM

views 6

WPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सच्या संघाचा मुंबई इंडियन्सवर २ गडी राखून विजय

बडोद्यात सुरु असलेल्या वूमन्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात काल शेवटच्या चेंडूपर्यंत खेळलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं २ गडी राखत मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला.    दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सना प्रथम  फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यानंतर मुंबई इंडियन्सनी १६४ धावा  केल्या, यात नॅट साइवर ब्रंट ने नाबाद ८० तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं ४२ धावांचं योगदान दिलं. संघातल्या इतर खेळाडू मात्र दशकाचा आकडा गाठण्यातही असफल ठरल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या...