January 11, 2026 8:15 PM January 11, 2026 8:15 PM

views 5

WPL दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातला सामना डी.वाय. पाटील मैदानावर रंगणार

महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या ८ षटकांमध्ये बिनबाद ९४ धावा झाल्या होत्या.

January 10, 2026 12:26 PM January 10, 2026 12:26 PM

views 8

WPL: RCB संघाचा गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ३ खेळाडू राखून विजय

महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या कालच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर ३ खेळाडू राखून विजय मिळवला. नवी मुंबई इथं झालेल्या या सामन्यात आधी फलंदाजी करताना मुंबई संघानं निर्धारित २० षटकांत ६ खेळाडू गमावून १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं २० षटकांत ७ खेळाडूंच्या मोबदल्यात १५७ धावा फटकावल्या आणि सामना जिंकला. या स्पर्धेत आजचा सामना गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स या संघांदरम्यान नवी मुंबईत रंगणार आहे.