September 19, 2024 6:01 PM September 19, 2024 6:01 PM

views 10

देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित वर्ल्ड फूड इंडिया २०२४ परिषदेला आज पहिल्या दिवशी त्यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केलं. प्रगतीशील कृषी पद्धती, भक्कम प्रशासकीय यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञान याद्वारे खाद्य प्रक्रिया क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यापक सुधारणा सुरू केल्या असल्याचं ते म्हणाले. अन्न प्रक्रिया क्षेत्रात १०० टक्के थेट परदेशी गुंतवण...