July 14, 2025 1:39 PM July 14, 2025 1:39 PM

views 18

जागतिक कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धेत भारताला उपविजेतेपद

बिश्केक इथं झालेल्या जागतिक कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धेत भारताच्या फ्रीस्टाईल संघाने उपविजेतेपद मिळवलं. भारतीय कुस्तीगीरांनी २ सुवर्ण, एक रौप्य आणि ५ कांस्यपदकं मिळवत १५७ गुणांची कमाई केली. सर्व प्रकारांमधे मिळून भारताला १० सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्यपदकं मिळाली.

August 22, 2024 1:32 PM August 22, 2024 1:32 PM

views 21

१७ वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू रोनक दहिया कास्यपदकाचा मानकरी

जाॅर्डन इथं झालेल्या १७ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या ग्रेको रोमन प्रकारात ११० किलो गटात भारतीय कुस्तीपटू रोनक दहियानं काल कांस्यपदक जिंकलं. त्यानं तुर्कीच्या इमरुल्ला कॅपकानचा ६-१ असा पराभव केला. तर ५१ किलो गटात साईनाथ पारधीनेही कांस्यपदक मिळवलं आहे.