March 3, 2025 7:49 PM March 3, 2025 7:49 PM
20
वन्यजीवन व्यवस्थापनासाठी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करवा – प्रधानमंत्री
वन्यजीवन व्यवस्थापनासाठी पारंपरिक ज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अधिक वापर करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमधे जुनागढ जिल्ह्यात सासण – गीर इथं राष्ट्रीय वन्यजीवन मंडळाच्या सातवी बैठक प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. नदीतल्या डॉल्फिन विषयीचं पहिलं वहिलं सर्वेक्षण त्यांनी प्रकाशित केलं. देशातल्या २८ नद्यांच्या परिसंस्थांचं सर्वेक्षण करुन हा अहवाल तयार केला आहे. आतापर्यंत ६ हजार ३२७ डॉल्फिन आढळले असल्याचं त्यात म्हटलं आहे. डॉल्फिन ...