March 22, 2025 1:41 PM March 22, 2025 1:41 PM

views 5

पाण्याची भविष्यातल्या पिढ्यांसाठी संरक्षण करण्याची गरज – प्रधानमंत्री

आज जागतिक जल दिवस आहे. आजचा दिवस पाण्याच्या जिवंत स्रोतांचं महत्व अधोरेखित करून त्याच्या शाश्वत व्यवस्थापनाचा पुरस्कार करतो. जगभरातल्या जलसंकटाचा सामना करण्यासाठी  जागरूकता निर्माण करून, कृतीला प्रेरणा देणं हे याचं उद्दिष्ट आहे. जागतिक जल दिवस हा २०३० सालापर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जोडला  आहे. ‘हिमनद्यांचं संवर्धन’, ही  यंदाच्या जल दिनाची संकल्पना आहे.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचं  संवर्धन आणि शाश्व...