September 27, 2024 8:07 PM

views 18

पर्यटन मंत्रालयाकडून ‘पर्यटन मित्र’ आणि ‘पर्यटन दीदी’ उपक्रम सुरू

जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज पर्यटन विभागानं देशभरात विविध उपक्रम आयोजित केले होते. या दिनानिमित्त केंद्रसरकारने “पर्यटन मित्र” आणि “पर्यटन दीदी” हे दोन नवीन उपक्रम सुरु केले. या उपक्रमात पर्यटक स्नेही मार्गदर्शक तयार करण्यासाठी महिला आणि युवकांना प्रशिक्षण दिलं जाईल. प्रशिक्षणानंतर त्यांना आपल्या भागातल्या पर्यटनस्थळांवर हस्तकला आणि इतर उत्पादनं तयार करणे, खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणं, निसर्गसान्निध्यात भटकंती, वारसा स्थळांची सफर असे कार्यक्रम आयोजित करता येतील. प्रायोगिक तत्वावर आतापर्यंत देशभ...

September 27, 2024 2:58 PM

views 38

पर्यटन स्थळांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर पर्यटन विभागाचा भर – मंत्री गिरीश महाजन

राज्यात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं पर्यटन स्थळांवर तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर पर्यटन विभागाचा भर असल्याचं पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. जागतिक पर्यटन दिनानिमित्त काल राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वेरुळ इथल्या राष्ट्रकूट पर्यटक निवासाचं उद्घाटन दूरस्थ पद्धतीने करताना ते बोलत होते.