March 24, 2025 6:50 PM

views 16

रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ‘जागतिक क्षयरोग विरोधी दिन’ साजरा

रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आज जागतिक क्षयरोग विरोधी दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना क्षयरोगाबद्दल माहिती दिली. त्या व्यतिरिक्त क्षयरोगमुक्त ग्रामपंचायती म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रशस्तिपत्रकं तसंच  सन्मानचिन्ह  प्रदान करून  गौरवण्यात आलं. क्षयरोग जनजागृतीच्या उद्देशानं आयोजित रांगोळी, निबंध, चित्रकला स्पर्धांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली.  हिंगोली जिल्ह्यातही क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतीना प्रशस्त...

March 24, 2025 6:47 PM

views 19

टीबीच्या १०,००० आयसोलेटचं जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण

केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली इथे टीबी अर्थात मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिसच्या १०,००० आयसोलेटचं जिनोम सिक्वेन्सिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली. जागतिक क्षयरोग विरोधी दिनानिमित्त सिंह यांनी ही घोषणा केली. जिनोमिक्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून क्षयरोगाच्या औषधांची क्षमता वाढवण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे. २०३० पर्यंत क्षयरोगावर मात करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचंही सिंह म्हणाले.