July 1, 2024 3:54 PM July 1, 2024 3:54 PM

views 16

टेनिस जगतातली प्रतिष्ठेची विंबल्डन स्पर्धा आजपासून रंगणार

हिरवळीच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या जगातल्या प्रतिष्ठेच्या विंबल्डन टेनिस स्पर्धेला आजपासून लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी गतविजेता कार्लोस अल्कराजचा सामना एस्टोनियाच्या मार्क लाजेल याच्याबरोबर होणार आहे. भारतीय खेळाडू सुमित नागलचा पुरुष एकेरीचा पहिला सामना सर्बियाच्या मियोमिर केस्मानोविक याच्याबरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डन यांचा सामना फ्रान्सच्या आद्रे मानारिनो आणि ज्योवां मेशी पेरिका या जोडी बरोबर होणार आहे...

June 30, 2024 7:19 PM June 30, 2024 7:19 PM

views 19

जागतिक टेबल टेनिस स्पर्धा : महिला दुहेरीत भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान

ट्युनिशिया इथं सुरू असलेल्या जागतिक टेबल टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत दिया पराग चितळे आणि यशस्विनी घोरपडे या भारतीय जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. विजेतेपदासाठी आज झालेल्या अंतिम लढतीत जपानच्या साकुरा योकोई आणि सात्सुकी ओडो या जोडीनं त्यांचा ३ - ० असा पराभव केला.