September 16, 2024 8:08 PM September 16, 2024 8:08 PM

views 14

भारताला वर्ल्ड स्किल्स २०२४ स्पर्धेत १६ पदकं आणि मेडलिअन्स ऑफ एक्सलन्स पुरस्कार मिळाला

भारतानं फ्रान्स इथं झालेल्या वर्ल्ड स्किल्स २०२४ स्पर्धेत १६ पदकं आणि मेडलिअन्स ऑफ एक्सलन्स पुरस्कार मिळवले आहेत. बेकरी उत्पादनं आणि मिठाई उद्योग, हॉटेल रिसेप्शन आणि नवीकरणीय उर्जा या विभागाच्या चार कास्यपदकांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त भारतीय पथकानं विविध व्यापार आणि विशेष कौशल्यांच्या विभागात उत्कृष्टतेचे १२ पुरस्कार मिळवले आहेत.   भारतीय पथकानं त्यांच्या कठोर परिश्रमानं देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केली आहे, असे प्रशंसोद्गार कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी काढले आहेत.