February 13, 2025 9:04 PM

views 35

रेडिओ हा माहिती, शिक्षण आणि मनोेरंजनाचा विश्वासू स्रोत-संजय जाजू

रेडिओ हा माहिती, शिक्षण आणि मनोेरंजनाचा विश्वासू स्रोत असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी म्हटलं आहे. ते आज जागतिक रेडिओ दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या रेडिओ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोल होते. आकाशवाणी ही जगातली सर्वात मोठी प्रसारण संस्था असून ही देशाच्या ९८ टक्के लोकांपर्यंत पोहचत आहे. आकाशवाणीने सर्वसामान्य श्रोत्यांमध्ये हवामान बदलाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल यांनी यावेळी सांगितलं. लोकांचा आकाशवाणीच्य...

February 13, 2025 1:45 PM

views 140

जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा

जगभरात आज जागतिक रेडिओ दिवस साजरा केला जात आहे. दरवर्षी १३ फेब्रुवारी रोजी, रेडिओच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि रेडिओद्वारे माहिती मिळवण्याकरता लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी, हा दिवस साजरा केला जातो. ‘रेडिओ आणि हवामान बदल’ ही यंदाच्या जागतिक रेडिओ दिनाची संकल्पना आहे.    रेडिओ म्हणजे संवादाचं टिकाऊ, बहुमुखी आणि सर्वत्र सहज उपलब्ध होणारं माध्यम असून त्याचं हे महत्त्व साजरं करण्याची संधी म्हणजे जागतिक रेडिओ दिन, असं युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझौले यांनी म्हटलं आहे.  &nb...