November 12, 2025 1:30 PM
32
आज ‘जागतिक न्यूमोनिया दिवस’
आज जागतिक न्यूमोनिया दिवस आहे. या निमित्तानं, प्रत्येक बालकाचं न्यूमोनिया पासून रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. बालपणातला न्यूमोनिया हा आजार हाताळण्यासाठी केंद्रसरकारनं मजबूत आरोग्य प्रणाली, जनजागृती आणि प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून प्रभावी यंत्रणा उभारल्याचं त्यांनी यात म्हटलं आहे.