August 10, 2025 1:50 PM August 10, 2025 1:50 PM
1
आज आंतरराष्ट्रीय सिंह दिवस
आज आंतरराष्ट्रीय सिंह दिवस साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या वन्यजीव संरक्षण क्षेत्रीतील भरीव कामगिरीच्या जोरावर अशियाई सिंहांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या ‘लायन ॲट फोर्टी सेव्हन’ अभियानातून हे शक्य झालं. आशियाई सिंहांचं भारतात आणि त्यातही गुजरातचं गीर अभयारण्य एकमात्र अधिवास आहे. जगभरात सध्या अनेक वन्य प्रजाती लुप्त होत असताना भारताचे प्रयत्न पर्यावरणीय संरक्षणाबाबत वचनबद्ध असल्याचं दर्शवत आहेत.