April 24, 2025 1:35 PM April 24, 2025 1:35 PM

views 5

जागतिक लसीकरण सप्ताहाला आजपासून सुरुवात

जागतिक आरोग्य संघटनेकडून राबवल्या जाणाऱ्या जागतिक लसीकरण सप्ताहाला आजपासून जगभरात सुरुवात झाली. हा सप्ताह ३० एप्रिलपर्यंत पाळला  जाईल. ‘लसीकरण सर्वांसाठी मानवीदृष्ट्या शक्य आहे,’ अशी यंदाच्या सप्ताहाची संकल्पना आहे. लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी हा सप्ताह दरवर्षी एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाळला जातो.  लसीकरणामुळे गेल्या ५० वर्षात १५ कोटी ४० लाख लोकांचा जीव वाचल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटनेनं केला आहे.