December 13, 2024 7:53 PM December 13, 2024 7:53 PM

views 27

महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट गाठेल, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट महाराष्ट्र २०२८ ते २०३० पर्यंत पूर्ण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईत वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेचा प्रारंभ करताना बोलत होते. गेल्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेनं अर्ध्या ट्रिलियन डॉलरचे उद्दिष्ट पार केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.    महाराष्ट्राला देशातलं सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकास धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहेच मात्र भविष्यात मुंबई फिनटेकच...