July 21, 2024 11:30 AM July 21, 2024 11:30 AM
12
जागतिक वारसा समितीचं ४६वं अधिवेशनाचं आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
जागतिक वारसा समितीचं ४६ वं अधिवेशन आजपासून नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता याचं उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझोले आणि युनेस्को जागतिक वारसा सचिवालयातले वरिष्ठ अधिकारी तसंच विविध देशातले सांस्कृतिक मंत्री, राजदूत आणि तज्ञ उपस्थित राहणार आहेत. भारत पहिल्यांदाच जागतिक वारसा समितीच्या अधिवेशनाचं यजमानपद भूषवणार आहे. हे अधिवेशन वर्षातून एकदा होतं.