September 29, 2024 1:54 PM September 29, 2024 1:54 PM
10
मंत्री किरेन रिजीजू यांनी मॅरेथॉनला दाखवला हिरवा झेंडा
जागतिक हृदय दिनानिमित्त केंद्रीय अल्पसंख्याक आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी आज नवी दिल्लीत इंडिया गेट ते भारत मंडपम दरम्यानच्या मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. या मॅरेथॉनमध्ये दीडशे रुग्ण आणि १०० डॉक्टरांहून अधिक जणांनी सहभाग घेतला होता. हृदयाच्या आरोग्याची जपणूक करण्याचं आवाहन करत रिजीजू यांनी यावेळी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.