April 7, 2025 7:40 PM April 7, 2025 7:40 PM
8
गरोदरपणा आणि बाळंतपणाशी निगडित कारणांनी दररोज ७०० महिलांचा मृत्यू-WHO
गरोदरपणा आणि बाळंतपणाशी निगडित कारणांनी २०२३ या वर्षात जगात प्रत्येक दोन मिनिटाला एका महिलेचा किंवा दररोज ७०० महिलांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त राष्ट्रांनी आणि जागतिक आरोग्य संघटनेनं आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त ही आकडेवारी जाहीर केली आहे. या मृत्यूमागची कारणंही टाळता येण्याजोगी होती, अशी माहितीही अहवालात दिली आहे. २००० ते २०२३ या कालावधीत मातामृत्यूंचं प्रमाण ४० टक्के कमी झाल्याचंही अहवालात म्हटलं आहे. माता मृत्यू कमी करण्याचा वेग २०१६ पासून मंदावला आहे आणि २०२३ या वर्षात गरोदरपणात कि...