August 11, 2025 8:21 PM

views 12

World Games 2025 : भारताची वुशू खेळाडू नम्रता बत्राची महिलांच्या ५२ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक

चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत भारताची वुशू खेळाडू नम्रता बत्रा हिनं महिलांच्या ५२ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. तिच्या या कामगिरीमुळे या स्पर्धेत वुशू या प्रकारात भारताचं पहिलंवहिलं पदक निश्चित झालं. उपांत्य फेरीत तिनं फिलिपीन्सच्या क्रिझान फेथ कोलाडो हिच्यावर २-० अशी मात केली. आता तिचा अंतिम सामना उद्या चीनच्या मेंग्युए चेन हिच्याविरुद्ध होणार आहे.

August 10, 2025 2:38 PM

views 15

World Games 2025 : तिरंदाजी प्रकारात भारताच्या ऋषभ यादवला कांस्यपदक

चीनमध्ये चेंगदू इथं सुरु असलेल्या जागतिक स्पर्धेत तिरंदाजी प्रकारात भारताच्या ऋषभ यादवनं कांस्य पदक पटकावलं आहे. दहाव्या मानांकित ऋषभनं उत्तम कामगिरी करत अनेकवेळा सुवर्णपदक जिंकलेल्या अभिषेक वर्माचा प्रभाव केला. महिलांच्या कंपाऊंड प्रकारात, मात्र भारताच्या परणीत कौर आणि मधुरा धामणगावकर यांचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत यंदा भारतीय खेळाडू तिरंदाजी, बिलियर्ड्स, रोलर स्केटिंग, वुशु आणि रॅकेटबॉल पाच खेळांमध्ये सहभागी होत आहेत. 

August 7, 2025 2:33 PM

views 26

यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार

चीनमध्ये चेंगडू इथे आजपासून सुरू होणाऱ्या यंदाच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. १९८१पासून सुरू झालेल्या या स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केल्या जातात आणि यात ऑलिंपिक स्पर्धेत समाविष्ट नसलेले खेळ खेळवले जातात. यंदा ३४ विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यावेळी भारतीय संघ तिरंदाजी, बिलियर्ड्स, रोलर स्केटिंग, वुशू आणि रॅकेटबॉल या पाच खेळांमध्ये भाग घेणार आहे.