September 26, 2025 12:00 PM September 26, 2025 12:00 PM

views 18

भारत, अन्न आणि कृषी क्षेत्रातील जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

जागतिक अन्न सुरक्षेत भारत सातत्यानं योगदान देत असून गेल्या १० वर्षांत देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढलं आहे असं पंतप्रधानांनी काल नवी दिल्लीत आयोजित वर्ल्ड फूड इंडिया २०२५ या कार्यक्रमात सांगितलं. आज भारत अन्न आणि कृषी क्षेत्रातील जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप परिसंस्था आहे असंही मोदी यांनी सांगितलं. लहान शेतकऱ्यांच्या संशक्तीकरणासाठी सरकारनं अनेक धोरणे आखली आहेत, गेल्या दहा वर्षांत भारतातील २५ कोटी लोकांनी गरिबीवर मात केली आहे असंही पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. चार दिवस चालणाऱ्या या कार्...

September 22, 2024 1:54 PM September 22, 2024 1:54 PM

views 9

वर्ल्ड फूड इंडिया २०२४ या चार दिवसीय महामेळाव्याचा समारोप

वर्ल्ड फूड इंडिया २०२४ या चार दिवसीय महामेळाव्याचा समारोप आज नवी दिल्ली इथं होत आहे. हा मेळाव्याला १९ सप्टेंबरपासून भारत मंडपम इथं सुरुवात झाली होती. जवळपास ९० देश, २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, १८ केंद्रीय मंत्रालय आणि इतर सरकारी संस्था या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम अन्नप्रक्रियेतील जागतिक केंद्र म्हणून भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकतो. यात अन्न प्रक्रिया क्षेत्रातील नावीन्य, तंत्रज्ञान आणि स्थैर यातल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. उद्घाटन समारं...

September 19, 2024 9:49 AM September 19, 2024 9:49 AM

views 10

विश्व अन्न संमेलन उपक्रमाला आज नवी दिल्लीत सुरुवात – नव्वदहून अधिक देशांचा सहभाग

विश्व अन्न भारत या चार दिवसांच्या भव्य उपक्रमाचा आज नवी दिल्लीत आरंभ होत आहे. नव्वदहून अधिक देश आणि 26 राज्य तसंच 18 केंद्रीय मंत्रालयं यात सहभागी होत असल्याचं अन्नपक्रिया मंत्रालयानं सांगितलं. जपान भागीदार देश असून विएतनाम आणि इराण हे लक्ष्यित देश असतील.   अन्न प्रक्रिया क्षेत्रातील नवे शोध, तंत्रज्ञान आणि शाश्वतता यांचा संगम या उपक्रमाचा मुख्य भाग असेल. अन्न प्रक्रियेमध्ये भारत एक जागतिक बलस्थान म्हणून उदयाला येत असल्याचं यामध्ये ठळकपणे मांडण्यात आलं आहे.