August 12, 2025 9:31 AM August 12, 2025 9:31 AM

views 13

आज ‘जागतिक हत्ती दिवस’

पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक असलेल्या हत्तींचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी तामिळनाडूमधील कोईमबतूर इथं जागतिक हत्ती दिनाच्या राष्ट्रीय उत्सवाचं आयोजन केला गेलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसंच तामिळनाडू वन विभाग यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या कार्यक्रमात हत्तींचं संवर्धन, मानव हत्ती संघर्ष सोडवणे या विष...

August 12, 2024 12:38 PM August 12, 2024 12:38 PM

views 4

हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा

जागतिक हत्ती दिनाच्या निमित्ताने देशात हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. हत्ती हे आपल्या इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेले आहेत, असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. हत्तींना राहायला अनुकूल वातावरण मिळण्यासाठी शक्य त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचंही प्रधानममंत्री यांनी सांगितलं. तसंच मागच्या काही वर्षात हत्तींच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं.