May 29, 2025 8:03 PM May 29, 2025 8:03 PM
6
जागतिक अर्थव्यवस्थेसाठी यंदाचं वर्ष लाभदायक ठरणार नाही-
वाढता आर्थिक राष्ट्रवाद आणि व्यापार शुल्कातल्या चढ-उतारामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेचे नकारात्मक पडसाद जागतिक आर्थिक स्थितीमधून उमटत असल्याचं जागतिक आर्थिक मंचाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलं आहे. व्यापार क्षेत्र दबावाखाली राहिल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी यंदाचं वर्ष लाभदायक ठरणार नाही, या शक्यतेवर जगातल्या प्रमुख अर्थतज्ञांचं एकमत असल्याचं यात म्हटलं आहे. सध्याच्या भू-राजकीय घडामोडी जागतिक अर्थव्यवस्थेपुढे तात्पुरते अडथळे निर्माण करणार नाहीत, तर महत्वाच्या संरचनात्मक बदल...