January 21, 2025 7:11 PM January 21, 2025 7:11 PM

views 7

जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत राज्यात गुंतवणुकीसाठी साडे ३ लाख कोटी रुपयांचे करार

दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज एकंदर ३ लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. जेएसडब्ल्यू समूहासोबत झालेल्या ३ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे राज्यातल्या उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.   या कराराअंतर्गत गडचिरोलीत २५ मिलियन टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प उभारला जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रीन मोबिलिटी, विद्युत बस, ट्रक आणि परवडण्याजोग्या इलेक्ट्रिक गाड्या...

January 20, 2025 8:27 PM January 20, 2025 8:27 PM

views 12

भारतात आर्थिक सुधारणांमुळे GDP दर 7-8% टक्के राहील- GDP अध्यक्ष बोर्ग ब्रेन्डे

भारतात आर्थिक सुधारणांमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकीच्या पार्श्वभूमीवर जीडीपी अर्थात राष्ट्रीय स्थूल उत्पादन वाढीचा दर सात ते आठ टक्के राहील असा अंदाज डब्ल्यूइएफ अर्थात जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी बोर्ग ब्रेन्डे यांनी वर्तवला आहे. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं आज या मंचाची ५५ वी बैठक सुरू झाली. त्यावेळी ते बोलत होते. या पाच दिवसांच्या बैठकीला १३० देशांचे ३ हजार प्रतिनिधी उपस्थित आहेत. त्यात साडेतीनशे सरकारी अधिकारी उपस्थित आहेत.   या बैठकीत विकास, नवीन तंत्रज्ञानाचा व...

January 19, 2025 3:12 PM January 19, 2025 3:12 PM

views 3

जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसला रवाना

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं उद्यापासून सुरु होणाऱ्या, जागतिक आर्थिक मंच २०२५ मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. प्रगतीपथावर मागे पडलेल्या वर्गांसह समाजातल्या सर्व स्तरांच्या विकासासाठी देशानं अनेक पावलं उचलली आहेत, असं वैष्णव यांनी प्रवासाला निघण्यापूर्वी सांगितलं.   पाच दिवसांच्या जागतिक आर्थिक मंच कार्यक्रमात, समावेशक विकास तसंच सामाजिक, भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचं लोकशाहीक...