January 19, 2025 9:51 AM January 19, 2025 9:51 AM

views 11

खोखो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरूष आणि महिला संघाची उपांत्यफेरीत धडक

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघानं उपांत्यफेरीत धडक मारली आहे. पुरुष संघानं श्रीलंका संघावर १००-४० अशी मात केली. रामजी कश्यप कालच्या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरला तर व्ही सुब्रमणी उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरला.   प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील महिला संघानं बांग्लादेश संघावर १०९-१६ असा विजय मिळवला. कालच्या सामन्यासाठी अश्विनी शिंदे सर्वोत्तम खेळाडू आणि ऋतुराणी सेन उत्कृष्ट बचाव खेळाडू ठरली.

January 12, 2025 11:22 AM January 12, 2025 11:22 AM

views 26

महिलांच्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत प्रियंका इंगळे भारतीय संघाची कर्णधार

भारतात होणाऱ्या महिलांच्या खो-खो विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली असून,संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केज तालुक्यातील कळमंबा गावची प्रियंका इंगळे हिची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.   प्रियंका सध्या प्राप्ती कर सहाय्यक म्हणून कार्यरत असून क्रीडा अधिकारी परीक्षेतही ती उत्तीर्ण झाली आहे.

June 15, 2024 2:32 PM June 15, 2024 2:32 PM

views 21

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा कॅनडासोबत सामना

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल. काल वेस्ट इंडिजच्या लॉडरहिलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेपाळवर अवघ्या एका धावेनं विजय मिळवला. तर अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. चांगल्या धावगतीच्या जोरावर  अमेरिकेने सुपर आठमध्ये प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या संघांनं पदार...