September 20, 2025 3:22 PM

views 43

जागतिक किनारा स्वच्छता दिनानिमित्त रत्नागिरीत स्वच्छता मोहीम

जागतिक किनारा स्वच्छता दिन आणि सेवा पर्व २०२५ या उपक्रमांतर्गत आज सकाळी रत्नागिरी तालुक्यातल्या भाट्ये समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, विविध शाळांचे विद्यार्थी आणि विविध कंपन्यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.   प्लास्टिक पिशव्या टाळण्याचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचं वितरण, तसंच नारळाच्या झाडाचं रोप लावण्यात आलं आणि सर्वांनी यावेळी स्वच्छतेची शपथ घेतली.