December 9, 2024 10:04 AM December 9, 2024 10:04 AM

views 9

विश्व बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याची ११व्या फेरीत आघाडी

फिडे जागतिक अजिंक्यपद बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश यानं ६-५ अशी आघाडी मिळवली आहे. सिंगापूरमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेच्या ११ व्या फेरीत काल गुकेशनं गतविजेत्या डिंग लिरेनवर मात केली. या विजयामुळे गुकेशनं सामने बरोबरीत राहण्याची मालिका खंडीत केली असून त्याच्या जगज्जेतेपदाची शक्यता आणखी वाढली आहे. या स्पर्धेतल्या तीन फेऱ्या होणं बाकी आहे.

December 8, 2024 10:43 AM December 8, 2024 10:43 AM

views 4

विश्व बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेश आणि डिंग लिरेन दहाव्या फेरीतही बरोबरीत

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेश आणि गतविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यातील दहावा सामना काल सिंगापूर इथं अनिर्णित राहिला. लिरेन आणि गुकेश प्रत्येकी 5 गुणांवर बरोबरीत आहेत तर अडीच दशलक्ष अमेरिकन डॉलर बक्षीस रक्कमेच्या या स्पर्धेतील चार खेळ बाकी आहेत. 14 फेऱ्यांनंतरही सामना बरोबरीत राहिल्यास, वेगवान बुद्धिबळपटू विजेता ठरेल.

December 5, 2024 2:31 PM December 5, 2024 2:31 PM

views 2

फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित

सिंगापूर इथं सुरु असलेल्या २०२४, फिडे जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश आणि चीनच्या डिंग लेरेन यांच्यातली आठवी फेरीही अनिर्णित राहिली. दोघांनाही प्रत्येकी ४ गुण मिळाले असून त्यांच्यातील अनिर्णित राहिलेली ही सलग पाचवी फेरी आहे. त्यांनी आतापर्यंत एक एक गेम जिंकला असून त्यांचे ६ अनिर्णित राहिले आहेत. या स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकण्यासाठी दोघांनाही प्रत्येकी ३ पूर्णांक ५ दशांश गुणांची आवश्यकता आहे.

December 4, 2024 2:26 PM December 4, 2024 2:26 PM

views 6

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश चा सामना चीनच्या डिंग लायरेन याच्याशी होणार

सिंगापूर इथे सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याचा सामना आज दुपारी चीनच्या डिंग लायरेन याच्याशी होणार आहे. दुपारी २ वाजून २० मिनिटांनी हा सामना सुरू होईल. ही या स्पर्धेची आठवी फेरी आहे. काल गुकेश आणि डिंग यांच्यात झालेला सातव्या फेरीचा सामना बरोबरीत सुटला होता.