January 4, 2025 2:38 PM January 4, 2025 2:38 PM
17
सर्वत्र जागतिक ब्रेल दिवस साजरा
आज जागतिक ब्रेल दिवस साजरा होत आहे. दृष्टिहीन आणि अंशतः दृष्टिहीन व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ब्रेलबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. वर्ष 2018 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जयंतीचं औचित्य साधून चार जानेवारीला ब्रेल दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. भारत सरकारनं दृष्टिबाधित व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी त्यांचे अधिकार, शिक्षण, रोजगार आणि कल्याणासाठी अनेक पावलं उचलली आहेत.