November 20, 2025 9:02 PM

views 26

विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय महिलांना सुवर्ण पदक

उत्तर प्रदेशातल्या नॉयडा इथं विश्वचषक मुष्टियुद्ध स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज अरूंधती चौधरी, प्रीति पवार, मीनाक्षी हुदा आणि नुपुर शेरॉन या भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी सुवर्ण कामगिरी केली. ७० किलो वजनी गटात अरूंधतीनं उझबेकिस्तानच्या अझिजा झोकिरोवाचा ५-० असा सपशेल पराभव केला. प्रीतिनं ५४ किलो वजनी गटात इटलीच्या सिरीन छाराबीचा ५- ० असा धुवा उडवला. मीनाक्षीनं ४८ किलो वजनी गटात उझबेकिस्तानच्या फोझिलोवा फरझोनाला ५-० असं सहज पराभूत केलं. नुपूरनं ८० किलोहून अधिक वजनी गटात उझबेकिस्तानच्या ओल्टिनॉय स...

April 6, 2025 1:14 PM

views 19

World Boxing Cup 2025 : भारताच्या हितेश गुलियाला सुवर्णपदक

ब्राझीलमध्ये झालेल्या जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेत आज पुरुषांच्या ७० किलो वजनी गटात भारताच्या हितेश गुलिया यानं सुवर्णपदक पटकावलं. हितेशनं अंतिम सामन्यात इंग्लंडच्या ओडेल कामारा याचा पराभव केला. भारताच्याच अभिनाश जामवालया यानं पुरुषांच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. अंतिम फेरीत अभिनाशला ब्राझीलच्या युरी रीसकडून ०-५ असा पराभव पत्करावा लागला. याआधी काल पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटात भारताच्या मनीष राठोड यानं कांस्य पदकाची कमाई केली.

April 5, 2025 7:56 PM

views 18

जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालचा अंतिम फेरीत प्रवेश

ब्राझील २०२५ च्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या अभिनाश जामवालनं  इटलीच्या जियानलुइगी मलंगावर विजय मिळवत, ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.