April 18, 2025 10:28 AM April 18, 2025 10:28 AM

views 19

सर्वोत्तम रुग्णालयांच्या क्रमवारीत नवी दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालय ९७ व्या स्थानी

जगातील सर्वोत्तम रुग्णालयांच्या 2024 वर्षाच्या क्रमवारीत नवी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स ने जागतिक क्रमवारीत, सर्वोत्तम रुग्णालय म्हणून 97वं स्थान पटकावलं आहे. न्यूजवीक आणि स्टेटिस्टा या संस्थांनी जगभरातील 2 हजार 400 रुग्णालयांच्या केलेल्या सर्वेक्षणानंतर ही क्रमवारी जाहीर केली आहे. रुग्ण समाधान, रोग निदान, स्वछता मानके आणि आरोग्यसेवेतील व्यावसाईकांच्या शिफारशी यानुसार ही क्रमवारी देण्यात आली आहे.