May 6, 2025 2:55 PM May 6, 2025 2:55 PM
7
आज, जागतिक दमा दिवस !
प्रदूषण, हवामान बदल आणि बदलती जीवनशैली यामुळे रुग्ण संख्या वाढत असलेल्या तसंच दीर्घ कालीन आजारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अस्थमा म्हणजेच दमा या आजाराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज सर्वत्र जागतिक दमा दिवस साजरा केला जात आहे. दमा हा आजार कोणत्याही वयात होणारा असल्यामुळे या रुग्णांनी आरोग्य राखून आजारावर नियंत्रण कसे ठेवावे, याबाबतही या दिवसाच्या निमित्तानं मार्गदर्शन केलं जात. “श्वासावाटे घेतली जाणारी दम्याची औषधं सर्वांना सहज उपलब्ध करून देणं” ही यावर्षीची संकल्पना आहे.