May 10, 2025 8:31 PM May 10, 2025 8:31 PM

views 12

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताने तीन पदकं जिंकली

शांघायमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात भारताने आज तीन पदकं जिंकली. पुरुष कंपाउंड स्पर्धेत अभिषेक वर्मा, ओजस देवतळे आणि ऋषभ यादव यांच्या संघानं अंतिम सामन्यात मेक्सिकोच्या संघाला पराभूत करून सुवर्णपदक जिंकलं.   महिलांच्या कंपाऊंड स्पर्धेत ज्योती सुरेखा वेन्नम, मधुरा धामणगावकर आणि चिकिथा तानिपर्थी यांच्या संघानं अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकलं. मेक्सिकोच्या संघाकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. भारतानं मिश्र सांघिक स्पर्धेतही कांस्यपदक जिंकलं.

March 15, 2025 3:30 PM March 15, 2025 3:30 PM

views 7

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम

सशक्त ग्राहक हा मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया आहे. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करणाऱ्या आणि सर्वांसाठी चांगले भविष्य घडवणाऱ्या शाश्वत जीवनशैलीसाठी आपण वचनबद्ध होऊ या, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त त्यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. ग्राहक म्हणून आपण सदैव जागरूक आणि सतर्क राहणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना वस्तूंचे दर, मुदत संपण्याची तारीख, वजन इत्यादी गोष्टी तपासून पाहणं आणि पावती...

October 6, 2024 3:51 PM October 6, 2024 3:51 PM

views 7

जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस

आज जागतिक सेरेब्रल पाल्सी दिवस आहे. मेंदूतल्या रक्तपुरवठ्यातील बिघाडामुळे स्नायुंच्या हालचाली प्रभावित होणं अशा स्वरुपातील हा आजार आहे. या आजाराबाबत जागृती आणि पिडीतांबद्दल सहवेदना व्यक्त करणं अशी या दिवसाची संकल्पना आहे. यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.