January 15, 2025 2:16 PM January 15, 2025 2:16 PM

views 16

दक्षिण आफ्रिका: सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ८२ कामगारांची सुटका, ३६ मृत

दक्षिण आफ्रिकेतल्या नॉर्थ-वेस्ट परगण्यात एका सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ८२ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून ३६ मृतदेह हाती लागले आहेत. अजूनही शेकडो कामगार आत अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मदतकार्य सुरु आहे. बेकायदेशीर उत्खननावर कारवाई म्हणून पोलिसांनी गेल्या ऑगस्ट पासून बेकायदेशीर खाणींना वेढा घालून कामगारांची रसद तोडली होती. गेल्या नोव्हेंबरपासून खोलवर अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य हाती घेण्यात आलं होतं.