April 27, 2025 8:37 PM April 27, 2025 8:37 PM

views 16

महिला क्रिकेटमधे भारताचा श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय

महिला क्रिकेटमधे, भारत, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिरंगी एकदिवसीय क्रिकेट मालिकेत, आज श्रीलंकेत कोलंबो इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं श्रीलंकेवर ९ गडी राखून विजय मिळवला.     भारतानं नाणेफेक जिंकून यजमान श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं, आणि त्यांचा डाव ३८ षटकं आणि एका चेंडूत १४७ धावांवर गुंडाळला. स्नेह राणानं ३, दिप्ती शर्मा आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.    विजयासाठी १४८ धावांचं आव्हान भारतानं २९ षटकं आणि ४ चेंडूत एका गड्याच्या मोबदल्यात पा...

February 14, 2025 10:43 AM February 14, 2025 10:43 AM

views 14

महिला प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वाला आजपासून वडोदरा इथं सुरुवात

महिला प्रीमियर लीग च्या तिसऱ्या पर्वाला आजपासून वडोदरा इथं सुरुवात होणार आहे. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू आणि गुजरात जायंट यांच्यातील सलामीच्या लढतीने आज संध्याकाळी साडे 7 वाजता सुरुवात होईल. पाच संघांमध्ये होणारी ही स्पर्धा 15 मार्च पर्यंत चालणार असून अंतिम सामना मुंबईत ब्रेबोर्न मैदानावर होणार आहे.

February 2, 2025 3:49 PM February 2, 2025 3:49 PM

views 18

U19 World Cup : महिला क्रिकेट स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय

महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालील टी ट्वेंटी  विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय  मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारातनं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. भारताची फलंदाज गोंगदी त्रिशा हिने नाबाद ४४ तर सानिका चाळकेनं नाबाद २६ धावांची खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.    त्याआधी प्रथम फलंदाजीसाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ फारशी चमकदार खेळी करू शकला नाही. अवघ्या ८२ धावा करून ...

July 20, 2024 9:14 AM July 20, 2024 9:14 AM

views 20

टी- ट्वेंटी महिला क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानला हरवत भारताची विजयी सलामी

महिलांच्या टी- ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत काल आपल्या पहिल्या साखळी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा ७ गडी राखून पराभव केला. श्रीलंकेतल्या दांबुला इथे काल झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत भारतीय महिला संघाला १०९ धावांचं आव्हान दिलं. भारतीय संघानं पंधराव्या षटकात तीन बळींच्या मोबदल्यात हे आव्हान सहज पार केलं. भारताचा पुढचा सामना उद्या संयुक्त अरब अमिरात संघाशी होणार आहे.

July 6, 2024 9:49 AM July 6, 2024 9:49 AM

views 12

महिला क्रिकेटमध्ये पहिल्या टी-20 सामन्यात, दक्षिण आफ्रिकेची भारतावर मात

  महिला क्रिकेटमध्ये, दक्षिण आफ्रिकेनं काल रात्री चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानावर तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा 12 धावांनी पराभव केला. विजयासाठी 190 धावांचा पाठलाग करताना भारतीय महिलांनी निर्धारित 20 षटकांत 4 बाद 177 धावा केल्या. तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 4 बाद 189 धावा केल्या.   दक्षिण आफ्रिकेसाठी तझमिन ब्रिट्सने 81 धावांचं योगदान दिलं तर भारताच्या स्मृती मन्धना हिनं 46 धावा केल्या. तझमिन ब्रिट्सला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. दक्...